त्यापैकी पहिली मूर्ती गणपतीची, दुसरी साडेसाती शनिदेवांचीं आणि तिसरी मूर्ती अडीच वर्षाच्या(ढैयाच्या)शनी देवांची आहे. यांना शनीची दृष्टी किंवा ढैय्या शनी देव असे ही म्हणतात. या मूर्तींच्या वरील बाजूस मारुतीची मूर्ती देखील आहे.
शनिश्चरी अवसेला त्रिवेणी संगमामध्ये अंघोळ करून शनी देवांचे दर्शन करण्याचे आपलेच महत्त्व आहे. शनिश्चरी अवसेला जगभरातील भाविक त्रिवेणी संगमेत स्नान करतात आणि तेथेच आपले कपडे आणि चपला सोडून देतात. याने दुर्भाग्य दूर होतं असे मानले गेले आहे. असे केल्याने सर्व कष्ट दूर होतात आणि शनीची कृपा दृष्टी राहते असे मानले गेले आहे.