या दिवशी प्रभू विष्णूंनी घेतला होता नृसिंह अवतार....

बुधवार, 4 मार्च 2020 (11:39 IST)
शास्त्रानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी नृसिंह द्वादशी म्हणून साजरी केली जाते. भगवन विष्णूंच्या 12 अवतारांपैकी हा एक अवतार आहे. या अवतारामध्ये शरीराचा अर्धा भाग माणसाचा तर अर्धा भाग सिंहाचा असल्याने याला नृसिंह अवतार म्हटले आहे. या दिवशी याच रूपात विष्णूंनी दैत्यराज हिरण्यकश्यपूचा वध केला. 
 
या प्रकारे वर प्राप्त केले....
अशी आख्यायिका आहे की हिरण्यकश्यपूने तपश्चर्या करून परमपिता ब्रह्मदेव यांना प्रसन्न करून वर मागितले होते की कोणत्याही मनुष्याकडून, प्राण्याकडून, दिवसात, रात्री, घरात, घराच्या बाहेर, अस्त्र, शस्त्राने, त्याचा मृत्यू होऊ नये. असं वर प्राप्त झाल्यावर तो फार अहंकारी झाला. स्वतःला देव समजू लागला. राज्यातील सर्व प्रजेवर अन्याय करू लागला. त्याचे म्हणणे होते की सगळ्या प्रजेने त्याची देव म्हणून पूजा करावी. 
 
मुलाला त्रास देणे महागात पडले....
हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विंष्णूंचा महाभक्त होता. त्याच्यावर संतापून हिरण्यकश्यपूने स्वतःच्या मुलाला मारण्याच्या अनेकवेळा प्रयत्न केला. एकदा ज्यावेळी हिरण्यकश्यपूने प्रह्लादला मारण्यासाठी शस्त्रं हाती घेतले त्याक्षणी स्वयं विष्णूदेव प्रह्लादाच्या संरक्षणासाठी खांब्यातून नृसिंह रूप घेऊन प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूला त्याचाच महालाच्या दाराच्या उंबऱ्यावर बसून स्वतःच्या मांडीवर घेऊन आपल्या वाघनखांनी त्याची छाती भेदून त्याचा अंत केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती