या दिवशी श्राद्ध कर्मच नाही तर काळसर्पदोषाचे निवारण पण केले जाते. श्राध्दपक्षात ज्या दिवशी ज्या तिथीला व्यक्ती दिवंगत होते त्याच दिवशी त्याचे कार्य केले जाते. पण कधी कधी तिथी माहित नसल्यामुळे या अवसेला तिथी मानून त्याचे कार्य करता येते. काही ठिकाणी या दिवशी जत्रा भरते. या दिवशी गंगेत स्नान करणे देखील लाभदायी मानले गेले आहे.