Matsya Dwadashi 2024: मत्स्य द्वादशीला या स्तोत्राचा पाठ करा, सर्व संकटे दूर होतील
गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (06:00 IST)
Matsya Dwadashi 2024 हिंदू धर्मा मत्स्य द्वादशीचे महत्तव आहे. हा दिवस भगवान विष्णूच्या पहिल्या अवतार मत्स्यातील अवताराचे स्मरण करतो. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असा विश्वास आहे. विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले, त्यातील पहिला अवतार मत्स्याच्या रूपात होता. पौराणिक कथेनुसार, एकदा हयग्रीवा राक्षसाने वेद चोरले. भगवान विष्णूने माशाच्या रूपात अवतार घेतला, हयग्रीवाचा वध केला आणि वेदांचे रक्षण केले. वेदांचे रक्षण करून भगवान विष्णूंनी धर्माची स्थापना केली आणि अधर्माचा नाश केला.
मत्स्य द्वादशीला स्तोत्र पाठ करण्याचे विशेष महत्व आहे. मत्स्य द्वादशीला भगवान विष्णुंच्या या स्तोत्राचे पठण करावे. याने चांगले परिणाम प्राप्त होतात.
मत्स्य अवतार हा भगवान विष्णूच्या पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली अवतारांपैकी एक मानला जातो. या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. मत्स्य अवताराने विनाशाच्या वेळी जगाचे रक्षण केले. या स्तोत्राचा पाठ केल्याने भीती आणि चिंता दूर होते. मत्स्य स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि सौभाग्य वाढते.