मोक्षदा एकादशीला सुख-समृद्धी मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (09:57 IST)
मोक्षदा एकादशी नावाप्रमाणे, मोक्ष देणारी एकादशी. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपासना व व्रत केल्याने पाप नष्ट होऊन त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर मोक्षदा एकादशी व्रत केल्याने पितरांनाही बैकुंठ प्राप्त होते असे सांगितले जाते.
या दिवशी उपवास करून भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. प्रत्येक मंत्राचा एक उद्देश असतो, त्याचा जप केल्याने त्याची सिद्धी होते. तुळशीच्या जपमाळाने भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. मंत्राचा उच्चार करताना शरीर, मन आणि शब्द यांचे योग्य उच्चारही आवश्यक आहेत. चला जाणून घेऊया विष्णूच्या मंत्रांबद्दल.