लक्ष्मण आणि उर्मिलेला 2 मुलं झाली अंगद आणि धर्मकेतू, जाणून घेऊ या त्यांची माहिती
शनिवार, 2 मे 2020 (12:40 IST)
महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणातील मुख्य पात्रे श्रीराम आणि सीता असे. पण आपण श्रीरामाच्या लहान भाऊ लक्ष्मणाच्या बायकोला उर्मिलाला विसरू शकत नाही. सीतेची धाकटी बहीण उर्मिला असे. त्यांचा आईचे नाव सुनैना आणि वडिलांचे नावं जनक असे. लक्ष्मण आणि उर्मिलेला दोन मुलं झाली. त्यांचे नावं अंगद आणि धर्मकेतू ठेवले.
रामायणाच्यानुसार लक्ष्मण श्रीरामांच्या सोबत उर्मिलेला सोडून 14 वर्षांसाठी वनवासाला जात असताना उर्मिलाने त्यांचा बरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली. अशात लक्ष्मण तिला म्हणाले की तिथे अरण्यात मी तर श्रीराम आणि सीतामाईच्या सेवेत असणार त्यामुळे मी आपल्या कडे लक्ष देऊ शकणार नाही. असे ऐकल्यावर उर्मिला मान्य करून थांबून जाते. लक्ष्मण राम रावणाच्या युद्धाच्या वेळी बेशुद्ध झालेले असताना मारुती त्यांच्यासाठी संजीवनी घेण्यास गेले असताना उर्मिलाने मारुतींना लक्ष्मण बेशुद्ध पडल्याचे खरे कारण सांगितले.
आनंद रामायणानुसार ज्यावेळी मारुती आपल्या डाव्या हातामध्ये संजीवनीचे डोंगर घेऊन श्रीरामाकडे जात असतात त्यामागील कारण असे की मारुतींना माहिती नव्हते की ह्या डोंगरामध्ये औषध कुठले?
मारुती अयोध्येवरून जात असताना त्यांनी अर्धरात्री प्रभू श्रीरामांच्या कुटुंबास भेट दिली. असे करणे त्यांना योग्य वाटले. त्यांनी सर्व कुटुंबीयांना भेट दिली पण ते उर्मिलेला भेटू शकले नाही. कारण उर्मिला पूजा करण्यात गुंग होत्या.
मारुतीने ध्यान लावून माहीत करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना लक्षात आले की उर्मिलाने 14 वर्षापर्यंत विशिष्ट साधना करण्याचे संकल्प घेतले आहे आणि त्यासाठीच ती ध्यानमग्न होऊन पूजा करीत आहे.
परंतू त्याच क्षणी त्यांना उर्मिलाने बोलावले आणि म्हणाल्या की मी आपणास ओळखले आहे मारुती राया. मला ठाऊक आहे की सध्या माझे पती बेशुद्ध आहे. आपण त्यांच्यासाठी संजीवनी घेऊन जात आहात. माझ्या पतीने शबरीच्या उष्ट्या बोरांचे अपमान केले होते त्या साठी त्यांना ही शिक्षा मिळाली. आता ही संजीवनीच्या रूपाने हे बोरच त्यांना जागृत करतील. हेच त्यांचे प्रायश्चित्त होय.