तुळस घरात असणे आवश्यक का? नक्की वाचा

गुरूवार, 9 जुलै 2020 (08:54 IST)
हिंदू मान्यतांनुसार प्रत्येक घराच्या बाहेर तुळस असणं आवश्यक मानले गेले आहे. एवढेच नव्हे तर जो माणूस दररोज तुळस खातो, त्याचे शरीर बऱ्याच चन्द्रायण उपवास करणाऱ्यांना मिळणाऱ्या फळासम पावित्र्य प्राप्त करतं. 

पाण्यामध्ये तुळशीपत्र घालून अंघोळ केल्याने तीर्थात स्नान करून पावित्र्य होण्यासारखे आहेत आणि जो माणूस असं करतो तो सर्व प्रकारच्या यज्ञात बसण्याचा अधिकारी असतो. 
 
एवढेच नव्हे तर हे वास्तुदोषाला दूर करण्यातही समर्थ आहे. दररोज तुळशीची पूजा करणं आणि झाडाला पाणी घालणं ही आपली जुनी प्रथा आहे. ज्या घरात दररोज 
 
तुळशीची पूजा केली जाते, तेथे नेहमी सुख-समृद्धी नांदते. पैशांची कमतरता भासत नाही. म्हणून आपल्याला दररोज तुळशीची पूजा केली पाहिजे.
 
घराच्या अंगणात तुळस असल्याने घराचे कलह आणि अशांती दूर होते. घरावर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. एवढेच नव्हे तर दररोज दह्यासोबत साखर आणि तुळशीच्या पानांचे सेवन करणं शुभ मानले आहे.
 
पौराणिक शास्त्रानुसार, तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवी देवांची विशेष कृपादृष्टी मिळते. दह्यासोबत तुळशीच्या पानांचा सेवन केल्याने अनेक प्रकाराचे आयुर्वेदिक लाभ मिळतात. जसे- दिवसभरात कामात मन लागतं, मानसिक ताण होत नाही, शरीर नेहमी ऊर्जावान राहतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती