मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र जाणून घ्या
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (11:49 IST)
मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर काही विशेष धार्मिक उपक्रम नियमाने केले जाता. जसे हात जोडून नमस्कार करणे, डोकं वाकून नमस्कार करणे, घंटा वाजवणे तसेच प्रदक्षिणा घालणे. परंतु अनेक लोकांना प्रदक्षिणा का घातली जाते यामागचे कारण माहिती नसेल. तर जाणून घ्या काय कारण असावं...
मंदिरात मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारीबाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घालत्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती दक्षिणवर्ती असते.
या कारणामुळे दैवीय शक्तीचा तेज आणि बळ प्राप्त करण्यासाठी भक्तांनी उजव्या हाताकडून प्रदक्षिणा करावी. डाव्याबाजूने प्रदक्षिणा घातल्याने दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती आणि आमच्या आंतरीक शक्ती यांच्यात टक्कर होते. परिणामस्वरूप आमचा तेज देखील नष्ट होऊ लागतो. म्हणून देव प्रतिमेच्या विपरीत पद्रक्षिणा घालू नये.
देवाची मूर्ती आणि मंदिराची प्रदक्षिणा नेहमी उजवीकडून सुरु झाली पाहिजे, कारण मुरत्यामध्ये आढळणारी सकारात्मक ऊर्जा उत्तर ते दक्षिण दिशेकडे प्रवाहित होते. डावीकडून प्रदक्षिणा घातल्याने प्रदक्षिणा घालत्याचा फायदा देखील होत नाही.
सूर्य देवाच्या सात, गणपतीच्या चार, विष्णू आणि त्यांच्या प्रत्येक अवतारांची चार, दुर्गा देवीची एक, हनुमानाच्या तीन, महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारींना ओलांडू नये. जलधारीपर्यंत पोहचून प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते.
प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा
यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।
या मंत्राचा अर्थ आहे की कळत-नकळत घडलेले आणि पूर्व जन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे. परमेश्वर मला सद्बुद्धि प्रदान करा.
प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारीबाजूला फिरुन केली जाते परंतू काही मंदिर किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकं जागा नसते, अशा स्थितीत मूर्तीसमोरच गोल फिरुन प्रदक्षिणा केली जाते.