पाहुण्यांना पाणी पाजणे किंवा जेवायला देण्याचे महत्त्व काय, जाणून घ्या खास 10 गोष्टी
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (09:54 IST)
पाहुण्यांना आपण देव समजतो. असे पाहुणे जे सूचना दिल्याविना येतात त्याना अतिथी म्हणतात. तसे तर सूचना देऊन आलेल्यांचे देखील स्वागत केले जाते. तरी अतिथीचा शाब्दिक अर्थ परिव्राजक, सन्यासी, भिक्षु, मुनी, साधु, संत आणि साधक असे आहे. अतिथि देवो भव: अर्थात अतिथी देवासमक्ष असल्याचे मानले गेले आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी पाजणे किंवा अन्न ग्रहण करायला देणे अत्यंत महत्तवाचे आहे त्यामागील कारण जाणून घ्या-
1. घरी आलेल्या पाहुण्यांनी पाणी ग्रहण केले नाही तर राहूचा दोष लागतो. अतिथीने पाणी ग्रहण करावे.
2. अन्न किंवा स्वल्पाहर दिल्याने पाहुणे तसेच स्वागत करणार्याला लाभ प्राप्ती होते.
3. गृहस्थ जीवनात राहून पाच यज्ञ पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे. पंच यज्ञांपैकी (1. ब्रह्मयज्ञ, 2. देवयज्ञ, 3. पितृयज्ञ, 4. वैश्वदेव यज्ञ, 5. अतिथि यज्ञ) एक आहे अतिथी यज्ञ. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
4. अतिथी यज्ञाला पुराणांमध्ये जीव ऋण देखील म्हटले गेले आहे. अर्थात घरी आलेल्या पाहुण्यांचे, याचक किंवा मुंग्या-पशु-पक्ष्यांचे उचित सेवा-सत्कार केल्याने अतिथी यज्ञ संपन्न होतं आणि जीव ऋण फेडलं जातं.
5. अतिथीचा अर्थ पाहुण्यांची सेवा करणे, त्यांना अन्न-पाणी देणे. विकलांग, महिला, विद्यार्थी, संन्यासी, चिकित्सक आणि धर्म रक्षकांची सेवा-मदत करणेच अतिथी यज्ञ आहे. याने संन्यास आश्रम पुष्ट होतं. हेच पुण्य आहे, हेच सामाजिक कर्त्तव्य आहे.
6. निसर्गाचं नियम आहे की आपण जितकं देतो त्याहून दुप्पट प्राप्त होतं. जर आपण धन किंवा अन्न धरुन ठेवण्याचा प्रयत्न कराल तर ते सुटत जातील. दानमध्ये सर्वात मोठे दान आहे अन्न दान. दानाला पंच यज्ञांपैकी एक वैश्वदेवयज्ञ देखील म्हटले गेले आहे.
7. गाय, कुत्रा, कावळा, मुंगी आणि पक्ष्यांच्या वाटेचं भोजन काढून ठेवणे गरजेचे आहे कारण हे आमच्या घराचे अतिथी आहेत.
8. एखाद्या ऋषी, मुनी, संन्यासी, संत, ब्राह्मण, धर्म प्रचारक इतर लोकांचे अचानक घराच्या दारावर येऊन भिक्षा मागणे किंवा काही दिवसांसाठी शरण मागणार्यांना देवाचे रुप मानले जात होते. घरी आलेल्या पाहुण्यांना उपाशी किंवा तहानेलेलं पाठवून देणे पाप समजले जात होते. हा तो काळ होता जेव्हा देव एखाद्या ब्राह्मण, भिक्षु, संन्यासी इतरांचे वेष धारण करुन भक्ताची परीक्षा घेत होते. प्राचीन काळात लोक 'ब्रह्म ज्ञान' प्राप्तीसाठी ब्राह्मण बनून जंगलात राहण्यासाठी निघून जात होते. आश्रमातील मुनी त्यांना भिक्षेसाठी गाव किंवा शहरात पाठवत होते आणि त्या भिक्षेवर ते आपली भूक भागवायचे.
9. घरी आलेल्या लोकांचे स्वागत- सत्कार करणे, अन्न-पाण्यासाठी विचारणे आपले सामाजिक संस्कार दर्शवतात ज्यामुळे मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते.
10. पाहुण्यांची सेवा केल्याने देवी-देवता प्रसन्न होऊन जातकाला आशीर्वाद देतात.