मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्रांचा चुकीचा उच्चार आणि त्यातून निर्माण झालेल्या अयोग्य स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो.
सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.
सोयर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.
मंत्रपठण करताना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे.
अर्थ: विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.
या मंत्रात इतकी शक्ती आहे की केवळ तीनदा देखील या मंत्राचा जप केल्यास नकारात्मकता किंवा भूत-प्रेताची बाधा जवळपास भरकटतं नाही.
गायत्री सद्बुद्धीचं मंत्र आहे, म्हणून या मंत्रांचा मुकुटमणी असे देखील म्हटले गेले आहे. नियमित 108 वेळा गायत्री मंत्र जप केल्याने बुद्धि प्रखर आणि कोणताही विषय अधिक काळ स्मरण ठेवण्याची क्षमता वाढते.