ते महादेव भक्त होते. त्यांनी सहस्रार्जुनाची इहलीला समाप्त केली. प्रायश्चित्तासाठी सर्व तीर्थी फिरून तपस्या केली. गणपतीला एकदंत करणारे देखील परशुराम होते. दानवीर इतके की सर्व पृथ्वी कश्यप ऋषींना दान करून दिली. त्यांच्या शिष्यत्वाचे लाभ दानवीर कर्ण यांनी घेतले ज्यांना त्यांनी ब्रह्मास्त्राची दीक्षा दिली.
भगवान परशुरामाची सेवा-साधना करणारे भक्त भूमी, धन, ज्ञान, अभीष्ट सिद्धी व दारिद्र्यापासून मुक्ती, शत्रू नाश, संतान प्राप्ती, विवाह, वर्षा, वाक् सिद्धी प्राप्त करतात.
परशुराम गायत्री मंत्र या प्रकारे आहेत-
1. 'ॐ ब्रह्मक्षत्राय विद्महे क्षत्रियान्ताय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।।'
2. 'ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्न: परशुराम: प्रचोदयात्।।'
3. 'ॐ रां रां ॐ रां रां परशुहस्ताय नम:।।'