आधार कार्ड वापरत नसाल तर होईल डिअॅक्टिवेट, जाणून घ्या UIDAI चे नियम

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड कागदपत्र नाही तर ओळख पत्र देखील आहे. कोणत्याही वित्तीय देणंघेणं आणि शासकीय योजनांचा लाभ 
 
घेण्यासाठी आधार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधार कार्डाचा एक नियम आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
UIDAI अनुसार, जर एखादा नागरिकाने तीन वर्षांपर्यंत आपला आधार वापरले नाही तर आधार डिअॅक्टिवेट अर्थात बंद होईल.
 
जाणून घ्या नियम
यूआईडीएआई अनुसार जर तीन वर्ष आधार वापरले नाही तर आधार कार्ड बंद करण्यात येतं. आधार कार्ड आपण शासकीय स्कीम्सचा लाभ घेण्यासाठी, पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ईपीएफओ डिटेल्स देण्यासाठी, पॅन कार्डला लिंक करण्यासाठी व इतर कामांसाठी वापरू शकता.
 
आपला कार्ड निष्क्रिय तर झाला नाही
आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्डाचे स्टेटस तपासू शकता. यासाठी आपल्याला यूआईडीएआई च्या वेबसाइटवर विजिट करावं लागेल. uidai.gov.in यावर क्लिक करून आपला आधार सर्व्हिसेज पर्याय निवडा, नंतर 'वेरिफाय आधार नंबर' वर आपला आधार नंबर टाका. आपण आधार नंबर टाईप केल्यावर आपल्या समोर हिरवा किंवा लाल रंगाचा चिन्ह येईल. चिन्ह हिरवा असल्यास आधार अॅक्टिवेट आहे आणि लाल रंगाचा चिन्ह दिसल्यास आधार कार्ड डिअॅक्टिवेट झाला आहे.
 
या प्रकारे करा अॅक्टिवेट
आपला आधार कार्ड डिअॅक्टिवेट आहे आणि आपण याला पुन्हा अॅक्टिवेट करू इच्छित असाल तर आपल्याला सर्व आवश्यक डाक्युमेंट्ससोबत आधार एनरोलमेंट सेंटर जावं लागेल. तेथे जाऊन आपल्याला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल, नंतर बायोमेट्रिक वेरिफाय केलं जाईल. नंतर आपला आधार अॅक्टिवेट होईल. यासाठी आपल्याला फीस देखील भरावी लागेल. 
 
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला एनरोलमेंट सेंटर मध्ये 50 रुपये द्यावे लागतील. या व्यतिरिक्त या प्रक्रियेत आपल्याला आपला एक वैध मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती