शव यात्रा दिसल्यास हे चार काम करा, मनोकामना पूर्ण होतील

जन्माला आलेल्याच्या मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू झाल्यावर अंत्येष्टी संस्कार करण्यापूर्वी शवा यात्रा काढली जाते. आपण ही अनेकदा शव यात्रा निघताना बघत असाल अश्या वेळेस काय चार काम करावे हे जाणून घ्या:
 
पहिले काम
शव यात्रेत सामील होऊन मृत देहाला खांदा दिल्याने पुण्य लागतं. या पुण्याईने सर्व पाप नाहीसे होते. या कारणामुळे अनेक लोकं शव यात्रेत सामील होऊन खांदा देतात.
 
दुसरं काम
रस्त्यात जाताना शव यात्रा दिसल्यास त्याजागी थांबून जावे. आधी शव यात्रेला रस्ता द्यावा. आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करावी.
 
तिसरं काम
शव यात्रा दिसल्यास किंवा त्यात सामील असताना राम नाम जपावे. श्रीरामचरित मानस याप्रमाणे राम नाम जपल्याने महादेव प्रसन्न होतात. शिवपुराण सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात अर्थात शिवा यांच्यात विलीन होते म्हणून राम नाम जपावे. याने शिव कृपा होते.
 
चौथं काम
शव यात्रा सामील असताना किंवा दिसल्यास मौन राहावे. गाडीवर असल्यास हॉर्न वाजवू नये. हे मृत व्यक्तीप्रती सन्मानाची भावना प्रकट करतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती