पहाटे सूर्याच्या प्रथम किरणासोबत जास्तकरून घरांमध्ये पूजा अर्चना सुरू होऊन जाते. धूप-दीपच्या सुवासाने वातावरण सुगंधित होऊन जाते, शंख आणि घंटीच्या मधुर ध्वनीमुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. पहाटे पूजा केल्याने संपूर्ण दिवस सुख-शांतीने जातो. विद्वानांचे असे मत आहे की सकाळी दैवीय शक्ती बलवान असतात आणि सायंकाळी आसुरी. देवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी पूजा पाठ अवश्य करायला पाहिजे. आसुरी शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्यास्तीनंतर देव उपासना करायला पाहिजे. म्हणून सकाळी व सायंकाळी केलेल्या पूजेचे आपले वेगळे महत्त्व असतात.