चाणक्य नीती : या 4 प्रकरणांमध्ये महिला पुरुषांपेक्षा अधिक पुढे आहे

शुक्रवार, 1 जानेवारी 2021 (07:07 IST)
आचार्य चाणक्य हे उत्तम धोरण निर्माता होते. त्यांना मुत्सद्दीपणाची आणि राजकारणाची चांगली समज होती.त्यांनी अर्थशास्त्रासारखे उत्तम पुस्तक रचले. त्यांना कौटिल्य नावाने देखील ओळखले जात होते. त्यांनी नीतिशास्त्रात मानवाच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत जे व्यक्तीला आयुष्यात यशस्वी बनायला प्रेरणा देतात. चाणक्याच्या नीतीमध्ये एका श्लोकात आचार्य चाणक्याने स्त्रियांना चार प्रकरणांमध्ये पुरुषापेक्षा पुढे सांगितले आहे.
 
त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोष्टगुण उच्यते।।
 
1  दोन पटीने भूक जास्त असते -
आचार्य चाणक्यानुसार बायका खाण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा पुढे असतात. श्लोकांमधील 'स्त्रीणां दि्वगुण आहारो' या शब्दाचा संबंध बायकांच्या भुकेशी आहे. श्लोकात चाणक्य म्हणतात की बायकांना पुरुषांपेक्षा दुपटीने जास्त भूक लागते. खरं तर पुरुषांपेक्षा बायकांना अधिक ऊर्जेची आवश्यकता असते म्हणून त्यांना जास्त भूक लागते. 
 
2 चार पटीने जास्त बुद्धी असते- 
चाणक्य नीतीच्या श्लोकात 'बुदि्धस्तासां चतुर्गुणा' ह्याचा अर्थ महिलांमध्ये बौद्धिक क्षमतेशी आहे. चाणक्यांच्या मते बायकांमध्ये पुरुषांपेक्षा चार पटीने जास्त बौद्धिक क्षमता असते. त्या पुरुषांपेक्षा जास्त हुशार आणि समजूतदार असतात. त्या आपल्या बौद्धिक क्षमतेने मोठ्या-मोठ्या समस्या सोडविण्यात सक्षम असतात.
 
3 सहापटीने जास्त धैर्य असते- 
चाणक्य नीतीच्या श्लोकात चाणक्य बायकांसाठी म्हणतात की 'साहसं षड्गुणं' म्हणजे जरी बायका शारीरिक शक्ती पेक्षा पुरुषांपेक्षा कमी असल्या तरीही धैर्याने पुरुष त्यांच्या पासून जिंकू शकत नाही. कारण बायकांमध्ये पुरुषांपेक्षा सहापटीने जास्त धैर्य असतो. आपल्या या गुणांमुळे त्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यास देखील घाबरत नाही.
 
4 आठपटीने जास्त कामुक असतात - 
आचार्य चाणक्याच्या श्लोकात बायकांसाठी' कामोष्टगुण' म्हटले आहे. म्हणजे कामुकतेच्या बाबतीत बायका पुरुषांपेक्षा आठपटीने जास्त कामुक असतात. म्हणजे या बाबतीत बायका पुरुषांपेक्षा बऱ्याच पटीने पुढे असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती