बुधवारी येणार्या अष्टमी तिथीला बुधाष्टमी म्हणतात. बौद्धिक त्रास दूर होण्यासाठी श्रद्धापूर्वक बुधाष्टमी हे व्रत करतात. बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे आहे. हे व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते असे देखील म्हणतात. याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात म्हणून त्याला नर्काचे भोगा भोगावे लागत नाही.
या दिवशी श्रीविष्णु, श्री गणेश, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पूजन करतात. या दिवशी बुद्धदेव आणि सूर्यदेवाची पूजा करण्याचे देखील विधान आहे. ज्यांच्या कुंडलीत बुध कमोजर असतो त्यांनी हे व्रत करावे. या व्रताने विपदा टळते आणि जीवनात सकारात्मकता अन् सफलता प्राप्त होते.
बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे
बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे आहे. साहस आणि शौर्यची गरज असलेल्या कामांमध्ये यश मिळविण्यासाठी हे व्रत केलं जातं. या व्रताची ऊर्जा व्यक्तीला संकटांना सामोरा जावून विजय देण्यास मदत करते. या व्रतामुळे सकारात्मक फल प्राप्ती होते. वाईट कर्मांचे बंधन दूर होतात. या दिवशी लेखन कार्य, घरात वास्तु संबंधित कार्य, शिल्प निर्माण संबंधी काम, अस्त्र-शस्त्र धारण करणारे काम आरम्भ देखील यश प्रदान करणारे ठरतात.
बुधाष्टमी व्रत करणार्यांनी संपूर्ण दिवस मानसिक, वाचिक आणि आत्मिक शुद्धीचे पालन करावे. देवासमोर धूप-दीप, पुष्प, गंध अर्पित करावे. देवाला पक्वान आणि सुके मेवे तसेच फळांचा नैवेद्य दाखवावा. पूजा-अर्चना झाल्यावर बुध देवाला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा.