पंचांग वाचल्याचे हे 5 फायदे

मंगळवार, 12 जानेवारी 2021 (09:02 IST)
प्राचीन काळात वेदांचा अभ्यास केला जात होता. त्यामध्ये शिक्षण, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प हे सहा वेदांग आहे आणि ज्याला जे वाचण्यात रस असायचा तो त्याचा पठण करायचा. या मध्ये ज्योतिषशास्त्राला वेदांचा डोळा मानला आहे. ज्योतिषात पंचांग शिकणे देखील कठीण आहे. असं म्हणतात की पंचांगाच्या श्रवण आणि पठण केल्यानं फायदे मिळतात.
 
वेदात आणि इतर ग्रंथामध्ये सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि नक्षत्रांची स्थिती अंतर आणि वेगाचे वर्णन केले आहे.स्थिती, अंतर आणि वेग यांच्या मुल्याकंन करून पृथ्वी वरील होणाऱ्या दिवस-रात्र आणि संध्याकाळला विभाजित करून एक पूर्ण अचूक पंचांग तयार केले आहे. 
 
पंचांग काळ दिनाला नामांकित करण्याची एक प्रणाली आहे. पंचांगाच्या चक्राला खगोलशास्त्रीय घटकांशी जोडले आहे. बारा महिन्याचा एक वर्ष आणि 7 दिवसाचा एक आठवडा ठेवण्याची प्रथा विक्रम संवत पासून सुरू झाली. महिन्याचा हिशेब सूर्य आणि चंद्रमाच्या वेगाने ठेवले जाते.
 
पंचांग हे नाव पाच प्रमुख भागांमुळे बनले आहे हे आहे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. ह्याच्या गणनेनुसार हिंदू पंचांगात तीन धारा आहेत -पहिली चंद्रावर आधारित आहे, दुसरी नक्षत्रावर आधारित आहे आणि तिसरी सूर्यावर आधारित कॅलेंडर पद्दत. संपूर्ण भारतात हे वेगवेगळ्या रूपात मानले जाते. वर्षांत 12 महिने असतात. प्रत्येक महिन्यात 15 दिवसाचे दोन पक्ष असतात- शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. प्रत्येक वर्षात दोन अयन असतात या दोन अयन राशीवर 27 नक्षत्र प्रवास करतात. 

पंचांगाचे पठण आणि श्रवण खूप शुभ मानले आहे. असे मानले जाते की भगवान श्रीराम देखील पंचांगाचा श्रवण करत होते. प्राचीनकाळात हे मुखाग्र ठेवण्याची प्रथा होती. कारण ह्याच आधारे सर्व काही जाणून घेत होते.
 
1 शास्त्र म्हणतात की तिथी किंवा तारीख पठण आणि श्रवण केल्याने आई लक्ष्मीची कृपा मिळते. तिथीचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या तिथीमध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते नाही हे जाणून घेणे फायदेशीर आहे. तारखा 30 असतात.
 
2 वार पठण आणि श्रवण केल्यानं आयुमध्ये वाढ होते. वारांचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या तिथीमध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते नाही हे जाणून घेण्यानं फायदा मिळतो. वार सात असतात.
 
3 नक्षत्रच्या पठण आणि श्रवण केल्यानं पापांचा नाश होतो. नक्षत्राचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या तिथीमध्ये कोणते काम करावे आणि कोणते नाही हे जाणून घेतल्यानं फायदा मिळतो. नक्षत्र 27 असतात.
 
4 योगाचे पठण आणि श्रवण केल्यानं प्रियजनांकडून प्रेम मिळतो आणि त्यांच्या पासून वियोग होत नाही. योग (शुभ आणि अशुभ)चे काय महत्त्व आहे आणि कोणत्या तिथीला कोणते कार्य करावे आणि कोणत्या तिथीला नाही हे जाणून घेतल्याने फायदा मिळतो. योग देखील 27आहे.
 
5 करणं च्या पठण आणि श्रवण केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात करण चे काय महत्त्व आहे आणि कोणत्या तिथीमध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते नाही हे जाणून घेतल्यानं फायदा मिळेल. करण 11 आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती