* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.