अद्भुत अनुभव, मृत्यूनंतर कसं वाटतं..!

शरीर मृत्यू असले तरी आत्मा अमर आहे, असे भारतीय संस्कृती सांगते. 'न हन्यते हन्यमाने शरीरे' अशा शब्दांमध्ये कठोपनिषद आणि भगवद्गीतेत आत्म्याचे अमरत्व वर्णन केले आहे. मृत्यू म्हणजे स्थूल देह आणि सुक्ष्म देह यांच्यामधील संबन्धांचा विच्छेद. सुक्ष्म देहासह आत्मतत्त्व शरिराबाहेर पडते व आपल्या कर्मानुसार पुढील गती किंवा जन्म प्राप्त करते, असे भारतीय दर्शानांमध्ये म्हटले आहे. 
 
संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यासाठी गेली चार वर्षे हृदयविकाराचा झटका आलेल्या व वैद्यकीयदृष्ट्या 'मृत्यू' पावलेल्या लोकांची पाहणी करण्यात आली. अशा रूग्णांपैकी 40 टक्के रूग्णांनी आपली चेतना व जाणीव 'त्या' काळातही अबाधित होती, असे सांगितले. त्या काळातील सर्व गोष्टी लख्ख आठवतात, असेही त्यांचे म्हणणे होते. हृदयक्रिया बंद पडल्यानंतर सर्वसाधारणपणे वीस ते तीस सेकंदांनी मेंदूचे कार्यही बंद होते. त्यामुळे अशा स्थितीत 'जाणीव' असणे वैद्यकीयदृष्ट्या संभवत नाही. मात्र, अशा स्थितीतही तीन मिनिटांपर्यंत आपण सर्व काही समजू शकत होतो आणि ते आताही आठवू शकतो, असे अनेक रूग्णांनी सांगितले. 
 
साऊथम्प्टन युनिव्हर्सिटीचे माजी रिसर्च फेलो आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्कचे डॉ. सॅम पार्निया यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले. त्यांना एका रूग्णाने सांगितले की, आपल्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसकडून जो प्रयत्न सुरू होता तो मी पाहत होतो. हे सर्व मी खोलीच्या एका कोपर्‍यातून पाहत होतो, असेही त्याने सांगितले. त्याने ज्या पाहिलेल्या गोष्टी सांगितल्या त्या तंतोतंत खर्‍या होत्या. संशोधकांनी ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रियातील पंधरा हॉस्पिटल्समधील 2,060 रूग्णांची पाहणी केली व याबाबतचे निष्कर्ष काढले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती