बुध, शुक्राच्या युतीमुळे दुर्लभ संयोग बनत आहे : अक्षय तृतीयाच्या दिवशी मेष राशित उच्चाच्या सूर्यासोबत बुध आणि शुक्राची देखील युती बनत आहे. ही युती सूर्योदयापासून पुढचा दिवस अर्थात 10 मे रोजी सकाळी 4 वाजून 13 मिनटापर्यंत राहणार आहे. या योगामुळे ज्या जातकांच्या पत्रिकेत चांडाल योग असेल त्यांचा त्रास थोडा कमी होणार आहे.
वक्री असलेले गुरु देखील या दिवशी सायंकाळी 5 वाजून 44 वाजता मार्गी (सरळ) होतील. यामुळे चांडाल योग असणार्या जातकांना आराम मिळेल. या दिवशी मृगशिरा नक्षत्रात अमृत कुंभ योग देखील बनत आहे. 12 वर्षानंतर येणार्या या योगात उच्चचा सूर्य मेष राशित, सोमवाराचा दिवस आणि सर्वार्थ सिद्घि योग आहे. हा सुख-समृद्धिचा देखील कारक आहे.