हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे 11 पानं तोडावे. पान खंडित नसावे. या 11 पानांवर स्वच्छ पाण्यात कुंकू, अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे. नाव लिहिताना हनुमान चालीसा पाठ करावा. सर्व पानांवर 'श्रीराम' नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी. ही माळ कोणत्या ही हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला अर्पित करावी.
कसे तयार कराल हनुमानाचा विशेष पान
या पानात केवळ कत्था, गुलकंद, बडीशेप, खोबरा बुरा आणि सुमन कतरी घालावी. हे पान ताजे, गोड आणि रसभरीत असावे. यात चुना, तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे.
कसे करावे हनुमानाला पान अर्पण
विधी-विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे 'हे हनुमान. हे गोड पान अर्पित करत आहे. माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे. अशी प्रार्थना करत पान अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होईल.