शिर्डी येथील सुप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात गुरूपौर्णिमा निमित्ताने तीन दिवसीय उत्सव आयोजित केला आहे. साई मंदिरासहसाई मंदिरासह परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यंदा दोन ते तीन लाख भाविक शिर्डीत दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची असुविधा शिर्डी संस्थानाकडून प्रयत्न केले जात आहेत.
6 जुलैला सकाळी काकड आरतीने उत्सवास प्रारंभ होईल. व्यास पौर्णिमेला आपल्या गुरूंचे पूजन करण्याची परंपरा फार वर्षांपासून चालत आली असून जगभरातून भाविक शिर्डी येथे साईबाबांचे पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. 6 ते 8 जुलै दरम्यान गुरूपौर्णिमा उत्सवात लाखो भाविक येथे उपस्थित होणार आहे. त्यांच्यासाठी भक्ती आराधणेचे विविध कार्यक्रमांचे येथे आयोजन करण्यात आले आहे.
7 जुलैला रात्री 9 ते 11 वाजे दरम्यान साई रथयात्रा निघेल. या काळात समाधी मंदिर भाविकांसाठी दिवस-रात्र खुले राहणार आहे. रात्री 11 वाजेपासून सकाळी 5 पर्यंत देशभरातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. 8 जुलैला दुपारी महाआरतीपूर्वी गोपाळकाला, कीर्तन व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.