मटार ढोकळा

साहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तांदूळ, 1 वाटी वाफवलेले मटार, 2 पालकाची पाने, 4 पानं कढीपत्ता, अर्धा इंच आलचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचा तीळ. सजावटीसाठी 1 चमचा कोथिंबीर, 1 चमचा ताजं खोबरं.
 
कृती : तांदूळ, चणाडाळ आणि उडीदडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्‍या   दिवशी निथळून मिक्सरला लावावे. त्यातच आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, हिंग, पालक आणि मटार घालून मिक्सरला लावावे. आता बाऊलमध्ये काढून 7 ते 8 तास झाकून ठेवावे. नंतर त्यात मीठ, तेल, खाण्याचा सोडा आणि थोडेसे पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाप्राणे बनवावे. ढोकळा वाफवण्यासाठी इडली पात्राला तेलाचा हात लावावा. त्यात तयार ढोकळ्याचे मिश्रण चमच्याने घालून 15 मिनिटे वाफवावे. ढोकळा गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून ताटात काढाव्यात. पॅनमध्ये गरम तेलात मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता व तीळ टाकून तयार तडका ढोकळ्यावर पसरवावा. कोथिंबीर व खोबर्‍याच्या मिश्रणाने सजवून ढोकळा खाण्यास द्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती