कृती : सर्वप्रथम ताकात बेसन, मीठ, तिखट, 1/2 चमचा हळद, साखर मिसळून त्याचा घोळ तयार करावा. एका भांड्यात तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग व कडीपत्ता घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात तयार केलेला घोळ टाकावा. एक उकळी येईपर्यंत त्याला हालवावे. उकळी आल्यावर मंद आच करून त्याला 10 मिनिटापर्यंत शिजवावे. नंतर कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे. ही कढी खिचडी किंवा पुलावासोबत फारच चविष्ट लागते.