चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते. ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे. या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते. गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो.
या दिवशी ध्वज उभारुन आनंदोत्सव साजरा केला. या दिवशी एका वेळुच्या काठीला तेल लावून स्नान घालतात. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात. कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात. नंतर कलश उपडा ठेवून. काठीला अंब्याचा डहाळा, लिंबाचा पाला बांधतात. या प्रकारे गुढी उभारुन वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात. आता एक उपाय जो आम्ही आपल्या सांगणार आहेत तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्ष भर घरात सुख-समृद्धी नांदते. धान्य, अन्नाची कमी भासत नाही. भंडार गृह भरलेले राहतात. आणि घरात आनंदी वातारवरण राहतं.
आपल्या सर्वांना माहितच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्यावर विधीवत पूजा करावी. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात किटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही.
तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांतून केवळ दोन पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने धनात वृद्धी होते. आर्थिक अडचणी दूर होतात. आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे. झाडावरुन सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते.