Gudi Padwa 2022 शनिवारी आहे गुढीपाडवा; असे आहे त्याचे महत्त्व आणि मुहूर्त

बुधवार, 30 मार्च 2022 (08:47 IST)
Gudi Padwa 2022 येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. हा दिवस मराठी नववर्षारंभाचा आहे. चौत्र सुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. मराठी शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्यापासून शालिवाहन शके १९४४ला प्रारंभ होत आहे. साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक अशी गुढीपाडव्याची ओळख आहे. या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते आणि नववर्षानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ समजला जातो. त्यामुळेच या दिवशी खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते.
 
सकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून सकाळी ८ वाजून २९ मिनिटेगुढीपाडव्याच्याच दिवशी प्रभू श्रीराम हे श्रीलंकेतून अयोध्येत परतले होते. यानिमित्ताने संपूर्ण अयोध्यावासियांनी घराबाहेर गुढी उभारुन श्रीरामांचे स्वागत केले तसेच आनंदोत्सव साजरा केला. गुढी हे चैतन्याचे, आनंदाचे आणि उत्सवाचे प्रतिक आहे. बांबूच्या काठीवर उभारली जाणारी ही गुढी भारतीय आणि मराठी संस्कृतीचे अत्यंत चैतन्यमयी ओळख आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती