रामदास आठवलेंबाबत नरेंद्र मोदीच निर्णय घेतील!

मंगळवार, 20 मे 2014 (10:55 IST)
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी सोमवारी सकाळी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. लोकसभेत प्रथित यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. याशिवाय आठवलेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्याचे समजते.

दरम्यान, रामदास आठवले यांना महायुतीने राज्यसभेवर पाठवले आहे. आता मंत्रिपदाचा निर्णय भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा