काँग्रेसमूक्त भारत असे बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - उध्दव ठाकरे

शुक्रवार, 16 मे 2014 (18:47 IST)
राज्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी म्हटले की काँग्रेसमूक्त भारत हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असल्याचे वाटत आहे. 
 
पुढे उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जावून मतदारांचे आभार मानले. शिवसेना विरूध्द नारायण राणे असा सामना नेहमीच राहिला आहे. राणे यांचे पूत्र निलेश राणे यांच्या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. या लढतीत निलेश राणे यांचा दणदणीत पराभव झाल्याने कोकणात शिवसेनेचा विजय झाला आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेण्याऐवजी कोकणात जावून पत्रकारांशी संवाद साधला. कोकण जनतेचे विशेष आभार मानीत मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे आश्वासन उदधव ठाकरे यांनी यावेळी दिले. 

वेबदुनिया वर वाचा