अमित शहांवर आता येणार महाराष्ट्राची जबाबदारी?

सोमवार, 19 मे 2014 (10:33 IST)
लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लक्ष आता आगामी महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपेच उत्तर प्रदेशचे प्रभारी आणि नरेंद्र मोदींचे विश्वासू अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते.

अम‍ित शहाना 'मिशन महाराष्ट्र' ही नवी जवाबदारी मिळणार आहे. येत्या जुलै महिन्यात शहा महाराष्ट्रात येण्याची चिन्हे आहेत. यावेळी महाराष्ट्रात येऊन अमित शहा हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतील. नंतर विधानसभा निवडणूक होईपर्यंत ते महाराष्ट्रातच थांबून आतापासून रणनिती आखणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात अमित शहांनी प्रभारी पद हातात घेतल्यावर 80 पैकी भाजपला सगळ्यात जास्त 71 जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशमध्ये चाललेली शहांची जादू महाराष्ट्रातही चालू शकते, या कारणानेच मोदींनी अमित शहांना महाराष्ट्रात पाठवण्याची तयारी केल्याचे समजते. 

वेबदुनिया वर वाचा