26 मे रोजी नरेंद्र मोदींचा शपथविधी- राजनाथसिंह
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या 26 मे रोजी (सोमवार) होणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आज (मंगळवार) सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्ची यांची भेट घेवून सरकार स्थापनेचे दावा केला. 26 मे रोजी सायंकाळी सहा वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
नरेंद्र मोदी यांना येत्या 26 मे रोजी शपथ द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) 335 खासदार शपथ घेणार आहे. यापैकी 282 खासदार हे भाजपचे आहेत. या सोहळ्याला 3000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.