स्मृती इराणी व प्रीती सहायमध्ये जुंपली

गुरूवार, 8 मे 2014 (10:42 IST)
भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आणि राहुल गांधींची बहीण प्रियंका गांधींच्या खासगी सचिव प्रीती सहाय या दोघींमध्ये चांगलीच जुंपली. जगदीशपूरमधील ठोरी गावातील एक मतदान केंद्रावर झालेल्या 'तमाशा'बाबत बुधवारी दिवसभर चर्चा होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेठीत बाहेरून आलेल्या लोकांनी 5 मे रोजीच जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश दिले असताना मतदानाच्या दिवशी प्रीती मतदान केंद्रावर काय करत होत्या, असा सवाल स्मृती इराणींनी केला. प्रीती सहाय यांनी प्रत्युत्तरादाखल सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला, मात्र, वाद वाढताना दिसल्यावर माघार घेतली. त्यांनंतरही स्मृती इराणींनी मतदान केंद्रावर उपस्थित पोलिस अधिकार्‍यांशी चांगलीच हुज्जत घातली.

स्मृती इराणींनी जिल्हाधिकारी जगत राम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सहाय बाहेरील व्यक्ती असल्यामुळे त्यांना तत्काळ जिल्ह्यातून बाहेर जाण्याचे आदेश दिले.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते बळजबरी लोकशाहीवर अत्याचार करत आहेत. प्रीती सहाय यांच्याकडे पोलिसांनी अधिकार पत्र का मागितले नाही? असा सवाल इराणी यांनी केला. प्रीती सहाय काँग्रेसला मदत करत असल्याचा आरोप इराणी यांनी केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा