'वरूण गांधींनी कुटुंबांचा विश्वासघात केला'

बुधवार, 16 एप्रिल 2014 (13:10 IST)
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे उमदेवार राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांची बहीण प्रियांका गांधी या आक्रमक दिसत आहेत. प्रियांका गांधी आणि चुलत भाऊ वरूण गांधी यांच्यातील वाकयुद्ध आता टोकाला गेले आहे.

कारण वरुण गांधींनी आपल्या कुटुंबाचा विश्वासघात केला, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. प्रियांका गांधी अमेठीतील सभेत बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या, निवडणूक ही कौटुंबिक चहा पार्टी नसून तत्वांची लढाई आहे. आपल्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले.

तसेच आपल्या मुलाने अशाप्रकारची चूक केली असती तर आपण त्याला कधीही माफ केले नसते, अशा शब्दात त्यांनी मनेका गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

प्रियांका गांधी यांनी यापूर्वी टीका करताना म्हटले होतं, 'वरुण आपला भाऊ असला तरीही रस्ता भरटकला आहे आणि त्याला जनताच रस्ता दाखवेल, यावर वरुणच्या आई मनेका गांधी प्रियांका गांधी यांना चोख उत्तर दिल होते. मनेका गांधी यांनी प्रियांका गांधी यांना उत्तर देतांना म्हटले होते, की 'जनताच ठरवेल कोण रस्ता भटकलं आहे'.

प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर वरूण गांधी यांनी ही उत्तर दिले आहे की, 'मी कधीही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. माझा मार्ग हा देशाचा मार्ग आहे. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मुद्दयांचे राजकारण करावे. वरूण गांधीनी सुलतानपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही टीका केली आहे.

वेबदुनिया वर वाचा