राज ठाकरेंच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

शनिवार, 17 मे 2014 (11:44 IST)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना राज्यातील मराठी मतदारांनी सपशेल नाकारले. राज्यात लढवलेल्या दहाच्या दहा जागांवर मनसेच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मोठी नामुष्की पत्करावी लागली. शिवसेनेला औकात दाखविण्याची जाहीर सभेत भाषा करणार्‍या राज ठाकरेंना अखेर जनतेनेच 'औकात' दाखवली आहे.

राज ठाकरेंनी राज्यात 10 जागांवर मनसेचे उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे मनसेचे उमेदवार निवडून येतील असे दावाही केला होता. मात्र अनेक जनतेच्या दरबारात राज मोदींचा 'ताव' फारसा रुचलेला ‍दिसत नाही. राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात मनसेबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता होती. मात्र मनसेला मत म्हणजे काँग्रेस आघाडीला मत असे चित्र निर्माण करण्यात महायुती पूर्णत: यशस्वी ठरली.
 

वेबदुनिया वर वाचा