मथुरा येथे भाजप-रालोद समर्थकांत जुंपली

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (12:10 IST)
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथे भाजप व रालोद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात तीन जण जखमी झाले असून हाणामारी दरम्यान अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली.

भाजपच्या उमेदवार हेमामालिनी व राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यात लढत  आहे. गुरुवारी मथुरा येथील बलदेव पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या एका मतदान केंद्रावर हेमामालिनी व  जयंत चौधरी समर्थक आमने सामने आले. दोन्ही समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली.  यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली. मात्र, या गोंधळाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी  गोळीबार केला. त्यामुळे परिसरात आणखीच तणाव वाढला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती ‍नियंत्रणात आणली.

वेबदुनिया वर वाचा