उध्दव ठाकरेंनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन

बुधवार, 14 मे 2014 (15:08 IST)
लोकसभा विवडणुकांच्या मतदानाचे टप्पे संपताच झालेल्या मतदानाच्या आधारे विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येणार्‍या एक्झिट पोलमध्ये एनडिएला बहुमत मिळणार असे सांगितले गेले. या एक्झिट पोलची माहिती मिळताच परदेशात असेलल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे फोन करून अभिनंदन केले आहे. अपेक्षेप्रमाणेच एक्झिट पोल असल्याचे सांगत प्रत्यक्ष निकालही यापेक्षा चांगले येतील, असे सांगत त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.

16 व्या लोकसभेसाठीचे नऊ टप्प्यातील मतदान संपले आहे. आता विविध राजकीय पक्षांतील नेत्यांना तसेच देशवासीयांना वेध लागले आहेत ते निकालाचे. अशातच अनेक वृत वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या भाजपा व एनडीएला बहमुत मिळेल, असा अंदाज दाखविण्यात येत आहे.

सध्या उध्दव ठाकरे परदेशात आहेत. परदेशात असतानाही ते देशातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून रोजच्या घडामोडींची माहिती देत आहेत.

वेबदुनिया वर वाचा