ऋषी पंचमी 2020 विशेष: कधी आहे ऋषी पंचमी व्रत कैवल्य, या उपवासाचे नियम, पूजाविधी आणि व्रताचे महत्त्व जाणून घेऊ या...
गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (15:37 IST)
हिंदू धर्मात अनेक सण येतात आणि त्यामधीलच एक सण आहे ऋषी पंचमी. यंदाच्या वर्षी हे व्रत 23 ऑगस्ट 2020 रोजी आहे. हे व्रत कैवल्य मासिक पाळीच्या वेळी केलेल्या पापांच्या प्रायश्चित्त करण्यासाठी केले जाते. ऋषी पंचमीचा दिवस पूर्णपणे सर्व ऋषी साठी समर्पित असतो. भाद्रपदाच्या शुक्लपक्षाच्या पंचमी तिथीला ऋषिपंचमी म्हणून ओळखले जाते. उपवासाच्या दृष्टिकोनातून हे व्रत खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. बऱ्याच वेळा बायका काही अडचणीमुळे हे व्रत करू शकत नाही. अश्या परिस्थितीत आपल्याला या व्रताचे उद्यापन करूनच व्रताची सांगता करावी, जेणे करून आपण कुठल्याही पापाचे भागीदार होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या ऋषी पंचमी व्रताची उद्यापन विधी आणि या व्रताचे महत्त्व...
ऋषी पंचमी उपवासाची पद्धत -
* ऋषी पंचमीचा उपवास करणाऱ्यांना या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे.
* आपण ऋषी पंचमी व्रताची विधी एकाद्या ब्राह्मणा कडून करवू शकता किंवा स्वतःदेखील करू शकता.
* ऋषी पंचमीच्या दिवशी सात पुरोहितांना जेवण्यासाठी बोलवावे आणि सप्तऋषी मानून त्यांची पूजा करावी.
* पुरोहितांना जेवू घालण्याच्या पूर्वी ऋषी पंचमीची पूजा आवर्जून करावी, या साठी पूर्ण घराला गायीच्या शेणांनी सारवावे.
* या नंतर सप्तऋषी आणि देवी अरुंधतीची मूर्ती बनवावी आणि कलश स्थापित करावं.
* कलश स्थापनेनंतर हळद, कुंकू, चंदन, फुल आणि अक्षताने पूजा करावी.
या मंत्राचे जप करावे –
कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा
* मंत्र जप केल्यावर सप्तऋषींची कहाणी ऐकावी आणि सात पुरोहितांना सप्तऋषी मानून त्यांना जेवू घालावं. जेवू घालून यथोचित दक्षिणा देऊन आवर्जून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, नंतर उद्यापन विधी संपूर्ण झाल्यावर गायीला जेवण द्यावं, कारण गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते.
ऋषी पंचमी 2020 तिथी आणि शुभ मुहूर्त -
ऋषी पंचमी तिथी सुरुवात 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटा वर.
ऋषी पंचमी पूजेचे मुहूर्त - सकाळी 11 वाजून 6 मिनिटा पासून दुपारी 1 वाजून 41 मिनिटा पर्यंत.
ऋषी पंचमी तिथी समाप्ती - 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 4 मिनिटा पर्यंत.
* इतर अनेक उपवासाप्रमाणे या व्रताला देखील स्त्रियांसह कुमारिका मुली करू शकतात. इतर उपवासाप्रमाणे निव्वळ या व्रताचे सौभाग्य किंवा इच्छित वर मिळावे यांच्याशी संबंध किंवा महत्त्व नसून, त्याचे फायदे वेगळे आहे.
* ऋषी पंचमीचे उपवास प्रामुख्याने कळत नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात. कोणत्याही वयोगटाच्या बायका हे व्रत करू शकतात. तथापि, नियमात राहून या व्रताला करावं.
* हा उपवास विशेषतः बायकांचा मासिकपाळीच्या काळात नकळत झालेल्या धार्मिक चुकांमुळे होणाऱ्या दोषांच्या संरक्षणासाठी हे व्रत केले जाते. याला या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे मानले जाते. ऋषी पंचमीच्या व्रताची कहाणी देखील बायकांच्या मासिक पाळीशी निगडित आहे.
* या व्रताची आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की या उपवासामध्ये कोणत्याही देवी आणि देवांची पूजा केली जात नाही. तर बायका या दिवशी सप्तऋषींची पूजा करतात. म्हणून या व्रताला ऋषी पंचमीच्या नावाने ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे की पंचमी तिथी पाचवा दिवस आणि ऋषींचे प्रतिनिधित्व करते.