हा गणपती 15 फूट उंच असून त्याला 66 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 295 किलो वजनाचे चांदीचे दागिने सजवण्यात आले असून, या गणपतीला आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत गणपती म्हटले जात आहे. मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती मूर्तीचा यंदा 360.40 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.याशिवाय या पंडालमध्ये चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी हाय डेन्सिटी कॅमेरे लावण्यात आले आहेत. कारण या पंडालमध्ये सर्वसामान्यांसोबतच मोठ्या व्यक्तीही पोहोचतात.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे 69वे वर्ष आहे. गेल्या वर्षी, GSB सेवा मंडळाने 316.40 कोटी रुपयांचा विक्रमी विमा उतरवला होता. त्यात यंदा 44 कोटींची वाढ झाली आहे. जीएसबी सेवा मंडळाने 69 किलो सोने आणि 336 किलो चांदीने सजवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे विश्वस्त आणि प्रवक्ते अमित डी पै यांनी सांगितले की, आमच्या गणेश मंडळाचा विमा सर्वसमावेशक आहे. यामध्ये सर्व जोखीम समाविष्ट आहेत, ज्यामध्ये भाविकांसाठी 30 कोटी रुपयांचा विमा देखील समाविष्ट आहे. प्रसिद्ध गणेश मंडळांवर करोडो रुपये खर्च केले जातात. यामुळेच गणेश मंडळेही त्यांचा विमा काढतात.