बोलबाला तव नावाचा आहे शेगावी

गुरूवार, 29 जुलै 2021 (08:39 IST)
बोलबाला तव नावाचा आहे शेगावी,
कळे न मजला बाबा महती मी तुझी कशी गावी!
शब्द ही पडती अपुरे, काय देऊ उदाहरणं,
येता शेगावी पाहताच तुज, फिटते पारण!
कित्ती देशील तू मजसारख्या किडा मुंगीला!
कमी न होवो पर भक्तीत माझ्या, कोणत्याही घडीला,
उपरती व्हावी अशी की व्हावं भलं,यश मिळो या पामराला!
धन्य ते लोकं जे आले तिथे तुझ्या दर्शनाला!
...अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती