नाही विकत घेता येत, "त्यांच्या"प्रती श्रद्धा!
अंतरी असावा लागतो ओलावा,अन विश्वास सदा!
फिरून यावे गुरू सवे, दुनियेत त्यांच्या,
मगच ओळख पटते "त्यांची"आंत मनाच्या,
नाही मग सुटत गाठी ह्या बद्ध झालेल्या,
न होतं विचलित मनही,कितीही कथा ऐकल्या,
जडतो केवळ परम विश्वास, अन प्रेम त्यांच्यावरी,
गुरुविण 'मोक्ष"न मिळे हाच विश्वास जडे अंतरी!
हात जोडा प्रेमभरे, झुकवा शिश घ्या नमते!
गुरू ची शक्ती च अशी की, भवसागरा पार करते!