अमेरिका आधुनिक शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सरकार तर खर्च करतेच, परंतु खाजगी शिक्षण संस्थाही खर्च करतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पुरेपूर काळजी येथे घेतली जाते. त्यामुळे येथे शिक्षण भरपूर महाग आहे.
या लेखात आपण अमेरिका आणि तेथील शिक्षण, येणार खर्च, तेथील काही संस्था यांची माहिती घेणार आहोत. अमेरिकेतील शिक्षणासाठी करावयाच्या अर्जाची किंमत भारतीय चलनात 500 ते 700 रुपये आणि जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये आहे.
अमेरिकेत शिक्षण घेण्यापूर्वी तेथील प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे. यासाठीही आपल्याला दोन ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो. भारतात शिक्षण जेवढे स्वस्त आहे, तितकेच अमेरिकेत ते महाग आहे.
तेथे केवळ पुस्तकांसाठीच 600 डॉलरचा खर्च करावा लागतो. ज्याप्रमाणे भारतात खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातूनही विविध कोर्स शिकवले जातात त्याच प्रमाणे अमेरिकेतही अनेक शिक्षण संस्था आहेत. सरकारी आणि खाजगी या दोघांच्या शैक्षणिक शुल्कांत बरेच अंतर आहे.
सरकारी शिक्षण संस्थांमध्ये 5 ते 9 हजार डॉलरचा खर्च येतो, तर खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये 10 ते 16 हजार डॉलरचा खर्च येतो. (भारतीय चलनात चार ते साडेसात लाख. )
खाजगी आणि सरकारी या दोन्ही शिक्षणसंस्थांमध्ये निवासाची व्यवस्था आहे. हा सारा खर्च मिळून 10 लाखांच्या जवळपास खर्च एका वर्षाला अपेक्षित आहे.
या व्यतिरिक्त तेथे जेवण, राहणीमान, प्रवास यासाठी प्रतिवर्ष चार ते पाच हजार डॉलरचा खर्च येतो. म्हणजे तुम्ही जर पाच वर्षांसाठी अमेरिकेत जाणार असाल तर तुम्हाला पन्नास लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सामान्य विद्यार्थ्याला इतका खर्च करणे अवघड आहे.
त्यामुळे अमेरिकेत जाताना तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. असे केले नाही, तर तुम्हाला शिक्षण अर्धवट सोडूनच घरी परतावे लागेल. भारतातीलच काय परंतु कोणत्याही परदेशी विद्यार्थ्याला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी नसल्याने तेथे काही शोधू हा विचारच चुकीचा आहे. भारतातील काही बँका अथवा आर्थिक संस्थांची मदत घेऊनच तुम्ही शिक्षणासाठी जाऊ शकता हे ध्यानात ठेवा.