कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (19:41 IST)
मध्यंतरीच्या काळात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या यायच्या. त्यावेळी या अफवा आहेत असं म्हटलं जायचं. पण आता त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालाय. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे जोडपं विवाहबद्ध होणार आहे.
कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी शाहरुख खानचा पूर्वाश्रमीचा बॉडीगार्ड असलेल्या यासीनवर आहे.
सर्व पाहुणे जैसलमेरला रवाना झालेत. या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय, करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत अशी जवळची मित्रमंडळी उपस्थित आहेत.
शेरशाहच्या सेटवर फुलली लव्ह स्टोरी
सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न कव्हर करण्यासाठी मुंबईतील अनेक पैपराझी फोटोग्राफर्स जैसलमेरला पोहोचले आहेत. फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जैसलमेरला आल्याची पोस्ट शेअर केलीय.
मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलीय.
भारताचे दिवंगत आर्मी जवान विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या शेरशाह या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे डेट करत असल्याचं समोर आलं.
शेरशाह चित्रपटात सिद्धार्थने विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती, तर कियाराने विक्रम बत्रांच्या गर्लफ्रेंडची डिंपलची भूमिका साकारली होती.
ही जोडी ऑनस्क्रीन तर यशस्वी झालीच पण खऱ्या आयुष्यातही यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मात्र या जोडीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' दिली होती हिंट...
सध्या सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या होम टाऊन दिल्लीत असून लग्नाच्या तयारीतही व्यग्र आहे.
भले ही या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये होत असतील तरीही या दोघांनी कधीच उघड उघड आपलं प्रेम व्यक्त केलं नाही. सिद्धार्थ आणि कियाराला त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारण्यात आले मात्र त्यांनी यावर कधीही स्पष्टीकरण दिलं नाही.
मीडियामध्ये जेव्हा यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या तेव्हा सिद्धार्थ करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आला होता.
यावेळी करणने कियाराचं नाव घेऊन सिद्धार्थला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आणि या एपिसोडनंतरच दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली होती.
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने मागे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा एक व्हीडिओ शेअर करत म्हटलं होतं की, 'हे कपल खूपच गोड आहे. सिनेसृष्टीत असं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं. दोघेही सोबत असताना सुंदर दिसतात.'
कंगनाने स्टोरीमध्ये सिद्धार्थ आणि कियाराला टॅग केलं होतं. कंगनाची ही इन्स्टा स्टोरी तिच्या फॅन्सना खूप आवडली.
या कलाकारांना एकत्र आणण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.
मागच्या काही वर्षात स्टार्ससोबत लग्न करण्याचा ट्रेंड वाढतोय. या वाढत्या ट्रेंडबद्दल ज्येष्ठ पत्रकार भारती दुबे सांगतात, "हा ट्रेंड सध्या वाढताना दिसतोय. बऱ्याच पॉप्युलर जोड्या लग्नबंधनात अडकल्या आहेत. यामागे सोशल मीडिया हे एक कारण आहे."
सोशल मीडिया या जोडयांना स्टार बनवतो, शिवाय त्यांची पॉप्युलॅरिटी टिकून राहते. उदाहरण म्हणून आपण करण कुंद्रा आणि तेजस्विनी प्रकाश बघू.
बिग बॉसनंतर ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. या ठिकाणी रणवीर आणि दीपिका असो किंवा रणबीर- आलिया असो की विकी कौशल आणि कतरिना असो. आजच्या जनरेशनला लग्नामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी कमी होईल याची चिंता नाहीये, ना प्रेक्षकांना याच्याशी काही देणंघेणं आहे. पण 90 च्या दशकात या स्टार्सना आपलं लग्न लपवून ठेवावं लागायचं, पण आज तसं नाहीये.
स्टार कपल्सच्या लग्नामुळे मार्केट व्हॅल्यू वाढते...
आपला मुद्दा पुढे नेताना भारती दुबे सांगतात, "लोकांना या जोड्या चित्रपटात तर आवडतातच पण खऱ्या आयुष्यातही त्यांना या जोड्या आवडतात. या कलाकारांना एकत्र आणण्यात कुठे ना कुठे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा चाहते त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतात, ज्यामुळे ते स्ट्रॉंग कपल म्हणून पुढे येतात.
जास्त ओव्हरएक्सपोजर होऊ नये ही सुद्धा एक गोष्ट आहे. नाहीतर बॉक्स ऑफिससोबतच त्यांना बिझनेसमध्येही फायदा मिळतो. यांना बरेच ब्रँड्स अप्रोच होतात, त्यांना मोठ्या जाहिराती मिळतात. यात दीपिका - रणवीर, विराट-अनुष्का, कतरिना-विकी आणि रणबीर-आलिया, सैफ-करीना या पॉवर कपल्सकडे बरेच ब्रँड्स आहेत.
कलाकारांच्या लग्नाचा ट्रेंड त्यांच्यासाठी खूप पॉजिटिव्ह आहे. यातून त्यांची मार्केट व्हॅल्यू आणखीन वाढते.