या जोडप्याच्या लग्नाची तारीख आधीच तुमच्या समोर आली आहे आणि कियारा तिच्या लग्नात मनीष मल्होत्राचा लेहेंगा घालणार आहे. आता दोघांचे लग्न कधी होणार, कोणत्या शहरात आणि सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तयारी कशी सुरू आहे हे जाणनू घ्या-
राजस्थानच्या भव्य पॅलेसमध्ये दोघांचे लग्न होणार
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न कसे होणार याची संपूर्ण माहिती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीचे लग्न जैसलमेरच्या आलिशान पॅलेस 'सूर्याघर' मध्ये 4 ते 6 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे.
सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला हे स्टार्स उपस्थित राहणार
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला 100-125 पाहुणे येणार आहेत. ज्यात त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त त्याच्या जवळच्या इंडस्ट्रीतील मित्रांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार करण जोहरपासून मनीष मल्होत्रा आणि कियारा अडवाणीची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी या लग्नात सहभागी होणार आहेत.
शेरशाहच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ-कियारा अडवाणीची प्रेमकहाणी सुरू झाली. या जोडप्याने कधीही आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले नाही आणि त्याच वेळी दोघांनीही त्यांच्या लग्नावर पूर्ण मौन पाळले आहे. तथापि जेव्हा ते दोघे करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण' च्या सीझन 7 मध्ये दिसले होते, तेव्हा कियाराने सांगितले होते की त्यांचे नाते मैत्रीपेक्षा जास्त आहे आणि 2023 मध्ये त्यांच्या लग्नाबाबत घोषणाही केली होती.