गँगस्टरच्या लूकसाठी हृतिकचे डाएट

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (09:12 IST)
अभिनेता हृतिक रोशनने तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. प्रतिदिन तीन हजार कॅलरीज कमर करण्यासाठी त्याने डाएट सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो आपली भाषा, लूक आणि बॉडी लँग्वेजवर काम करीत आहे. तो या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे.
 
हा त्याचा 25 वा चित्रपट असून याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान एका पोलीस अधिकार्या ची भूमिका  साकारणार आहे. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती