हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी हवाई दल अधिकाऱ्यांना सादर केली #थँक्यूफायटर पत्रे!

मंगळवार, 23 जानेवारी 2024 (14:52 IST)
वचन दिल्यानुसार, अभिनेता हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी पुण्याच्या हवाई दल स्थानकाला भेट देऊन आपल्या धाडसी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना आदरपूर्वक सुपूर्द केली #थँक्यूफायटर पत्रे! सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ हा भव्य हवाई साहसी दृश्ये असलेला चित्रपट आहे, जो सिनेरसिकांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास केवळ तीन दिवस बाकी आहेत.    
 
भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व साहसाला आणि शौर्याला सलाम करण्याकरता, या चित्रपटाच्या टीमने #थँक्यूफायटर ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे नागरिकांना देशाच्या हवाई योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक विशेष संधी प्राप्त झाली. आश्वासन दिल्यानुसार, चित्रपटातील प्रमुख कलाकार हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी पुण्याच्या हवाई दलाच्या तळाला भेट दिली आणि त्यांनी व्यक्तिगतरीत्या #थँक्यूफायटर पत्रे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केली.
 
#थँक्यूफायटर मोहिमेद्वारे देशव्यापी पत्रे गोळा करून, आपल्या देशाच्या शूर राष्ट्रवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि भारतीय हवाई दलाच्या चैतन्याचा आणि शौर्याचा सन्मान व्यक्त करत, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी त्यांचे वचन पूर्ण केले आणि पुण्याच्या हवाई दलाच्या तळावरील हवाई योद्ध्यांसोबत कृतज्ञतेचा हा क्षण साजरा केला.
 
#थँक्यूफायटर उपक्रमाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेअंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातून २ लाख ५० हजार हस्तलिखित पत्रे आणि १० लाख ऑनलाइन पत्रे जमा झाली. आपल्या देशाच्या संरक्षणाकरता हौतात्म्य पत्करलेल्या अनाम भारतीय हवाई योद्ध्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्याची ही सुवर्ण संधी नागरिकांना उपलब्ध झाली होती. या मोहिमेअंतर्गत हवाई योद्ध्यांप्रति नागरिकांनी हृद्य आभार संदेश व्यक्त केले आहेत. आपल्या देशाच्या हवाई दलातील योद्धांना श्रद्धांजली वाहण्यास आणि कृतज्ञता प्रकट करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला.   
 
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’च्या सहकार्याने ‘वायाकॉम१८ स्टुडिओ’द्वारे प्रस्तुत, ‘फायटर’ या सिनेमात सिनेरसिकांना उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हृदयस्पर्शी साहसी कथा आणि उत्फुल्ल देशभक्ती यांचा गोफ विणणारा हा चित्रपट एक अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देतो. २५ जानेवारी २०२४ रोजी 'फायटर' हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होत असून, हा भव्य अनुभव घेण्याकरता सज्ज राहा. ‘फायटर’ या चित्रपटाने सिनेमॅटिक उत्कृष्टतेची नवी व्याख्या परिभाषित केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती