Refresh

This website p-marathi.webdunia.com/article/fifa-world-cup/ronaldo-sparks-rumours-of-engagement-with-girlfriend-georgina-rodr%C3%ADguez-118062200015_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

चार मुलांचे वडील रोनाल्डो विश्वचषकानंतर करणार प्रेयसीशी लग्न

फीफा विश्वचषकात सध्या सुपर स्टार आणि दुनियेतील सर्वात धनवान फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो च्या नावाची धूम आहे. त्याची 22 वर्षीय गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्झ देखील रशियात पोहचली आहे आणि सध्या दर्शकांसाठी आकर्षण बिंदू आहे.
 
केमर्‍यात स्पॉट झाली जॉर्जिना : लग्नाशिवाय मातृत्व सुख प्राप्त करणारी जॉर्जिना रॉड्रिग्झ हिने सर्वांना तेव्हा हैराण केले जेव्हा तिच्या हातात हिर्‍याची अंगठी दिसली. मग काय जॉर्जिनाची ही इंगेजमेंट‍ रिंग चर्चेचा विषय ठरली.
 
विश्वचषकानंतर रोनाल्डो करेल लग्न : फीफा विश्वचषकात पोर्तुगालची यात्रा कुठे संपेल हे तर माहीत नाही परंतू कर्णधार रोनाल्डो ज्याची नेटवर्थ 2679 कोटी रुपये आहेत आणि रियाल मैड्रिडने ज्याला 1856 कोटी रुपयात 2021 पर्यंतचा करार दिला आहे, ज्याचे सोशल मीडियात 29 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहे तो विश्व चषकानंतर आपल्या प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्झ हिच्याशी आधिकारिक रूपाने लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
 
आई मारिया डोलेरोसला पसंत आहे जॉर्जिना : रोनाल्डो आपल्या आईची प्रत्येक गोष्ट ऐकतो. रोनाल्डोचा जन्म झाला तेव्हा कुटुंब गरिबीत होता. वडील शासकीय माळी होते आणि आई दुसर्‍याच्या घरात स्वच्छतेचं काम करायची. विपरित परिस्थतीत आईने रोनाल्डोला मोठे केले. त्याच्या आईदेखील गर्लफ्रेंड जॉर्जिना पसंत आहे आणि मुलाने तिच्यासोबत लग्न करावे हे त्यांचीही इच्छा आहे.
 
रोनाल्डोची जॉर्जिनाशी पहिली भेट : रोनाल्डोची जॉर्जिनाशी पहिली भेट 2016 च्या शेवटी झाली. जॉर्जिना स्पेनची राजधानी मैड्रिड येथे गुच्ची स्टोअरमध्ये काम करायची. नोव्हेंबरमध्ये डिस्नेलॅंड पॅरिस येथे दोघांना सार्वजनिक रूपात एकमेकांच्या हातात हात घालून पाहिले गेले, तेव्हापासून त्याने साथीदार निवडला ही समजूत झाली होती. तेव्हा जॉर्जिना लंडनमध्ये इंग्रजीचे अध्ययन करून नंतर मॉडलिंगसाठी नृत्य शिकत होती.
 
लग्ना केल्याविना चार मुलांचे वडील रोनाल्डो : क्रिस्टियानो रोनाल्डोचं लग्न झालेले नाही तरी त्याला चार मुले आहेत. 12 नोव्हेंबर 2017 मध्ये जॉर्जिना रॉड्रिग्झने एका सुंदर मुलगी अलाना मार्टिनाला जन्म दिला. याच्या सुमारे पाच महिन्यापूर्वी रोनाल्डोला सरोगेसीच्या मदतीने जुळे मुलं (मातेओ आणि ईवा) जन्माला आले होते जेव्हाकि 2010 मध्ये सरोगेसीने ज्युनियर क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म झाला होता. या प्रकारे जॉर्जिना एकाच घरात चार मुलांचा सांभाळ करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती