रविवारी दोन सामन्यात आश्चर्यकारक निकालाची नोंद झाली. मेक्सिकोने माजी विजेत्या र्जमनीला 1-0 ने पराभवाचा धक्का दिल्यानंतर स्वित्झर्लंडने ब्राझील संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना खेळला जाण्यापूर्वी ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जात होती परंतु स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.
ब्राझीलच्या फिलीप कोतिन्होने सामन्याच्या 20 व्या मिनिटाला शानदार असा मैदानी गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलपोस्टपासून बरच लांब अंतरावरून मारलेला हा फटका स्वीत्झर्लंडच्या गोलरक्षकाला रोखता आला नाही. मध्यांतरापर्यंत ब्राझीलकडे 1-0 अशी आघाडी होती आणि ब्राझीलचेच चेंडूवर नियंत्रण होते. चेंडूवर ताबा मिळविणसाठी स्वीस खेळाडू संघर्ष करीत होते.
रोस्टोव एरीना स्टेडियमवरील हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती स्टेडिम हे प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमारसुध्दा या लढतीत खेळला. अनेक विश्वचषक खेळण्यचा अनुभव असलेल्या नेयमारला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण तो फारसा चमकला नाही.