कृती-
सर्वात आधी शेंगदाणे, काजू, बदाम आणि नारळाचे तुकडे भाजून घ्या. आता शेंगदाण्याचे कवच काढून टाका आणि सर्व भाजलेले साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता तूप गरम करा, मावा घाला आणि परतून घ्या. माव्यात गूळ घाला आणि वितळेपर्यंत शिजवा. व शेंगदाण्याचे मिश्रण घाला आणि तूप वेगळे होईपर्यंत अर्धा मिनिटे शिजवा. आता एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण प्लेटवर पसरवा. थंड झाल्यावर, इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली शेंगदाणा बर्फी.