शेंगदाण्याची बर्फी रेसिपी

बुधवार, 1 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य- 
दोन कप शेंगदाणे भाजलेले आणि सोललेले 
एक कप साखर
अर्धा कप पाणी
1/4 कप दूध पावडर
दोन चमचे तूप
1/4 टीस्पून वेलची पावडर 
काही बारीक चिरलेले बदाम, पिस्ता 
 
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. एका पातेल्यात साखर आणि पाणी टाकून गॅसवर ठेवावे. साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहावे. पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. बारीक केलेले शेंगदाणे, दूध पावडर आणि वेलची पावडर  एकत्र करावे. आता या मिश्रणात हळूहळू गरम पाक घालावा आणि सतत ढवळत राहावे. हे मिश्रण सतत ढवळत राहून ते घट्ट होईपर्यंत शिजवा आणि एकत्र चिकटू लागेल. गॅस बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून पसरवा. वर बारीक चिरलेले बदाम किंवा पिस्ते गार्निश करावे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर हव्या त्या आकारात कापून घ्यावे. तर चला तयार आहे आपली शेंगदाण्याची बर्फी रेसिपी 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती