सर्वात आधी रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्यावे. आता ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. आता एका कढईमध्ये दूध घालून उकळून घ्यावे. व दुधाला घट्टपणा येईसपर्यंत उकळवून घ्यावे. आता दुधामध्ये उकडलेले रताळ्याचे तुकडे घालावे. व आता शिजवून घ्यावे. आता यामध्ये साखर घालावी. आता यामध्ये वेलची पूड घालावी तसेच गुलाबजल घालावे. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तसेच आता यामध्ये तुम्ही सुकामेवा म्हणजेच काजू बदाम घालावे. तर चला तयार आहे आपली थंडी विशेष रताळ्याची रबडी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.