साहित्य : एक वाटी साबुदाणा(भिजवलेला), एक वाटी शिंगाड्याचे पीठ, दोन उकडलेले बटाटे, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, सैंधव मीठ, काळेमिरेपूड चवीप्रमाणे, थोडं शेंगदाण्याचे तेल किंवा तूप.
कृती :
पहिली पद्धती : बटाट्यांना कुस्करून घेऊन शिंगाड्याचे पीठ मिसळा. बाकी सर्व जिन्नस देखील मिसळून घ्या. लागत लागत पाणी घालत कणकेसारखे मळून घ्या. आता हातावर पाणी लावून बारीक बारीक गोळ्या करून त्याला पुरीचा आकार द्या. तव्यावर तेल सोडा आता या पुरीला पराठे शेकतो त्या प्रमाणे शेकून घ्या. चांगल्या प्रकारे शेकून झाल्यावर दह्या बरोबर सर्व्ह करा.